Pune Crime Branch News | मेफेड्रॉन अंमली पदार्थाची विक्री करणार्या दोघांना केले जेरबंद; 15 लाख 77 हजारांचा माल हस्तगत (Video)

पुणे : Pune Crime Branch News | अंमली पदार्थांची विक्री करणार्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell Pune) पकडून त्यांच्याकडून १५ लाख ७७ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
हुसेन नुर खान (वय २१, रा. नवाझीस पार्क, संपन हाईटस, कोंढवा) आणि फैजान अयाज शेख (वय २२, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार विशाल दळवी यांना माहिती मिळाली की कॅम्पमधील महात्मा गांधी रोडवरील कोळसे गल्लीमध्ये लॉक मेकर्स दुकानाजवळ दोघे जण उभे आहेत. पोलिसांनी तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १५ लाख ७७ हजार रुपयांचा ७७ ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ मिळून आला. लष्कर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर एन डी पी एस अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार संदेश काकडे, विशाल दळवी, विनायक साळवे, प्रविण उत्तेकर, दत्ताराम जाधव विपुल गायकवाड, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.