Beed Crime News | मस्साजोगमधील आवादा कंपनीच्या कामगाराचा मृतदेह रस्त्यावर; बीडमध्ये पुन्हा खळबळ

Dead-Body-1

बीड : Beed Crime News | केज तालुक्यातील आवादा एनर्जी (Avaada Energy) या पवन ऊर्जा कंपनीतील एका पंजाब राज्यातील मजुराचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. केज येथील रोडवर संबंधित कामगाराचा मृतदेह सापडला आहे. सदर कामगाराचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला?, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या मृत कामगारांचे नाव रचपाल हमीद मसीह असे आहे.

पंजाब राज्यातील हा कामगार केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. रचपाल मसीह असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे. केज शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या चांदणी बार समोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले. केज पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ताब्यात घेतला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.