Young entrepreneur Punit Balan | युवा उद्योजक पुनीत बालन यांचा रसिकाग्रणी पुरस्काराने सन्मान; सामाजिक कार्याचा कृतज्ञतापूर्वक गौरव (Video)

पुणे : Young entrepreneur Punit Balan | पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल स्वर झंकार महोत्सवात रसिकाग्रणी पुरस्काराने (Rasikagarni Award) सन्मानित करण्यात आले. पं. अतुलकुमार उपाध्ये (Pandit AtulKumar Upadhye), पं. विजय घाटे (Pandit Vijay Ghate) आणि पद्मश्री हरिहरन (Padmashree Hariharan) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देशात सर्वाधिक शहरांमध्ये स्वर झंकार संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. पुण्यात या महोत्सवाचे सोळावे वर्ष आहे. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी या महोत्सवात वादन केले आहे. याच मोहत्सवात पुनीत बालन यांच्या विविध क्षेत्रातील अतुलनीय अशा सामाजिक कार्याची दखल घेऊन उपाध्ये व्हायोलिन वादन विद्यालयाच्यावतीने स्व. दाजी काका गाडगीळ यांच्या स्मरणार्थ रसिकाग्रणी हा मानाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी जावेद अली, राहुल देशपांडे, राजस उपाध्ये आणि तेजस उपाध्ये यांचीही उपस्थित होती.
बालन यांनी त्यांच्या मातोश्री इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या (Indrani Balan Foundation) माध्यमातून काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्य दलाच्या बंद पडलेल्या १५ शाळांचे नूतनीकरण करून त्या पुन्हा सुरू करून त्या चालविण्यासाठी लष्कराबरोबर सामंजस्य करार केला आहे. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळा ते चालवतात. अतिरेकी हल्यात बळी गेलेल्या मुलांना खेळापासून विविध प्रकारची मदतही बालन यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि वैयक्तिकरित्याही केली जाते. याशिवाय उदयोन्मुख खेळाडूंना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारी सर्वोतोपरी मदतही ‘पुनीत बालन ग्रुप’च्या (Punit Balan Group-PBG) माध्यमातून ते करतात. काश्मीरमध्ये सर्वांत उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्याचे काम त्यांनी केले. याशिवाय गरजु रुग्णांना मदत, वेगवेगळ्या मोहत्सवाबरोबरच धार्मिक कार्यातही बालन यांच्याकडून नेहमीच मोलाचे मदत कार्य केले जाते.
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) उत्सवप्रमुख आणि विश्वस्त म्हणून काम करत असताना कोविड महामारीच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाला मदतीचा हात देण्याचे मोठे काम बालन यांनी केले. त्यांच्या याच वेगवेगळ्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना स्वर झंकार मोहत्सवात सन्मानित करण्यात आले.
कोट
‘‘स्वर झंकार संगीत महोत्सवात ‘रसिकाग्रणी’ पुरस्काराने सन्मान झाल्याने मनस्वी आनंद झाला. मी करत असलेल्या समाज कार्यासाठी या पुरस्काराने भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी निश्चितपणे प्रोत्साहन मिळाले असून या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी आयोजकांचा मनापासून आभारी आहे.’’
- पुनीत बालन (युवा उद्योजक)
संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या आणि क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक दिग्गज व्यक्तींना आत्तापर्यंत हा पुरस्कार दिला आहे. उद्योजक पुनीत बालन हे स्वतः संगीत क्षेत्रात नाहीत मात्र, संगीत क्षेत्रातील प्रत्येक कलेला संगीत मोहत्सव, गणेशोत्सव या सर्वांना नेहमी प्रोत्साहन देण्याचे काम करतात. समाजात श्रीमंत लोक खुप आहेत परंतू बालन यांच्या सारखे दानशूर व्यक्तिमत्व खुप कमी आहेत. त्यामुळे या वर्षीच्या पुरस्कारासाठी संस्थेने त्यांची निवड केली.
- पं. अतुलकुमार उपाध्ये