Walmik Karad | वाल्मिक कराडचे पिंपरी -चिंचवड कनेक्शन उघड, कोट्यवधींचा फ्लॅट, महापालिकेने बजावली नोटीस

Ranjit Kasale On Walmik Karad | 50 crores offer for encounter of accused Walmik Karad, sensational claim of police officer (Video)

पिंपरी : Walmik Karad | बीड मधील खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचे पिंपरी-चिंचवड कनेक्शन उघड झाले आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावावर वाकडमधील पार्क स्टेट येथे सहाव्या मजल्यावर ६०१ नंबरचा कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट आहे. सुमारे १ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी वाल्मिक कराडच्या फ्लॅटच्या दरवाज्यावर कर संकलन विभागाकडून नोटीस लावण्यात आली आहे. कराडने ही थकबाकी न भरल्यास महानगरपालिका पुढे नेमकी काय कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाल्मिक कराडवर मंगळवार (दि.१४) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर परळीत मात्र आंदोलन सुरू झाले असून कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे. बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. वाल्मिक कराडची ७५ वर्षांची आई आणि पत्नीही या ठिय्या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.