Bavdhan Pune Crime News | पुणे: बावधनमधील अनधिकृत हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

पुणे : Bavdhan Pune Crime News | बावधन परिसरातील अनधिकृत हुक्का पार्लरवरून (Hookah Parlour In Pune) प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोणतीही परवानगी नसताना ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी दिल्याने पोलिसांनी १२ जानेवारी रोजी पबवर कारवाई केली. दरम्यान, बावधन परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी एका उद्योजकाची रात्रभर दारू पार्टी रंगली होती. त्यानंतर पुन्हा अनधिकृत हुक्का पार्लर सुरू असल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे.
बावधन पोलिस ठाण्याच्या (Bavdhan Police Station) हद्दीत म्हाळुंगे येथे बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो बारमध्ये (Bombay Bistro Restro Bar) सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर बावधन पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये ६,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सौम्यरंजन शिशिरकुमार बेहरा Soumyaranjan Shishirkumar Behera(वय २१, रा. वाकड), राहुल श्रीकांत कुलकर्णी Rahul Shrikant Kulkarni (वय ३७, रा. भूगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस अंमलदार दत्तात्रय शिंदे यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हाळुंगे येथे बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो बारमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती बावधन पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा घालून कारवाई केली. हॉटेलमध्ये हुक्क्याचा वेगळा झोन न करता ग्राहकांची गर्दी करून त्यांना जेवण्यास व हुक्का पिण्यास एकत्र बसविल्याचे आढळले.
हॉटेलमध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरू होते. याबाबत पोलिसांनी कारवाई करून हॉटेल कामगार सौम्यरंजन आणि मॅनेजर राहुल कुलकर्णी यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. कारवाईमध्ये ६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते (Sr Pi Anil Vibhute) म्हणाले, ” संबंधित हॉटेलमधील दारू विक्रीचा परवाना एका महिलेच्या नावावर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच हॉटेलमालकाचा शोध सुरू आहे. यात किती भागीदार आहेत, भाडेकरार आहे का, याबाबत तपास सुरू आहे.”