Wanwadi Pune Crime News | फॉरेन मेडिकल ग्रॅज्युऐट परिक्षेत बसला डमी उमेदवार ! राम टेकडी येथील आय ऑन डिजिटल झोनमधील प्रकार

पुणे : Wanwadi Pune Crime News | फॉरेन मेडिकल ग्रॅज्युऐट परीक्षेला एका उमेदवाराच्या जागी डमी उमेदवार बसला असल्याचे आढळून आले. याबाबत परिक्षक विशाल लक्ष्मण भोसले यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अनवर मकबुल आलम Anwar Maqbul Alam (वय २६, रा. मोहम्मदनगर, पादरी बाजार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ हा प्रकार रामटेकडी येथील आय ऑन डिजिटल झोन येथे रविवारी सकाळी नऊ ते साडेचार वाजेच्या दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन मेडिकल ग्रॅज्युऐट एक्झाम डिसेंबर २०२४ ही परिक्षा रामटेकडी येथील आय ऑन डिजिटल झोन येथे रविवारी सकाळी नऊ ते साडेचार वाजेच्या दरम्यान आयोजित करण्यात आली होती. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनच्या वतीने टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस यांच्याकडून या परिक्षेचे आयोजन केले जाते. ही परीक्षा सुरु असताना परिक्षक भोसले यांना सौरभ संजय श्रीवास्तव (रा. भाटवालीया, देवरिया, जि. देवरिया, उत्तर प्रदेश) या उमेदवाराच्या जागी अनवर मकबुल आलम हा पेपरला डमी उमेदवार म्हणून बसला असल्याचे आढळून आले. श्रीवास्तव याच्या जागी आलम याने डमी म्हणून परिक्षा देऊन टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस आणि नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन यांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करीत आहेत.