Hadapsar Pune Crime News | एटीएम मशीन फोडणार्‍यास जागेवरच अटक; मुंबईहून मिळाला होता पोलिसांना अलर्ट, हडपसरमधील पहाटेची घटना

Atm Theft

पुणे : Hadapsar Pune Crime News | हडपसरमधील घुले वस्ती येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये पहाटे साडेचार वाजता शिरुन मशीनची तोडफोड करु लागला. लागलीच त्याचा अलर्ट मुंबईहून हडपसर पोलीस ठाणे आणि ११२ ला मिळाला. तातडीने पोलीस संबंधित एटीएम सेंटरमध्ये पोहचले आणि तोडफोड करणार्‍या चोरट्याला पकडले. (Hadapsar Police Station)

शंभू कुमार श्रीनगेंद्र सिंग महतो (वय २९, रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) असे या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एटीएम सर्व्हिलन्स अधिकारी हर्षल सुरेंद्र सुतार (वय ३७, रा. आदर्शनगर, उरुळी देवाची) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मांजरी येथील घुले वस्तीमधील एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये सोमवारी पहाटे साडेचार वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घुले वस्तीत एचडीएफसी बँकेचे एटीएम सेंटर आहे. हे सेंटर इंटरनेटद्वारे मुंबईतील सर्व्हरशी जोडले गेले आहे. त्याच्यावर २४ तास सीसीटीव्हीमार्फत नजर ठेवली जाते. पहाटे साडेचार वाजता शंभु महतो हा एटीएम सेंटरमध्ये शिरला. त्याने एटीएम मशीनमध्ये छेडछाड करण्यास सुरुवात केली. त्याबरोबर मुंबईतील सेंटरला याची खबर लागली. त्यांनी एकाचवेळी ११२ आणि हडपसर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. शंंभु याने मशीनचे समोरील बॉक्स बाहेर काढला. त्याचे पैसे बाहेर येतात, ते काऊंटर तोडले, मशीन उघडण्याचा प्रयत्न करु लागला. मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत पोलीस तेथे पोहचले. त्यांनी शंभु महतो याला अटक केली. पोलीस अंमलदार शिंदे तपास करीत आहेत.