Bapu Pathare MLA | वडगावशेरीतील दफनभूमीच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन आमदार बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत; लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आश्वासन

Bapu Pathare MLA

वडगावशेरी : Bapu Pathare MLA | वडगावशेरी येथील दफनभूमीच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन काल (ता. १३) रोजी संपन्न झाले. हिंदू लिंगायत समाज, मुस्लिम समाज तसेच ख्रिश्चन समाजासाठी या दफनभूमीची सोय करण्यात आली आहे. दफनभूमी बऱ्याच वर्षांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत होती. वडगावशेरी मतदासंघाचे नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी तिन्ही समाजाचे प्रमुख व नागरिक उपस्थित होते.

“दफनभूमीच्या नूतनीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अत्याधुनिक सुविधांयुक्त या दफनभूमीचा विकास होणार असून, लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यावर भर असणार आहे. मतदारसंघातील तिन्ही समाजबांधवांसमोर असलेला मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे”, असे यावेळी पठारे यांनी सांगितले.

भूमिपूजन प्रसंगी, मा. नगरसेवक योगेश मुळीक, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर शिंदे, मुस्लिम समाजाचे अब्बास शेख सादिक आलमेलकर (अध्यक्ष, जामा मस्जिद), कासिम पठाण आमिर भाई तसेच डीवाईन चर्च प्रमुख धर्मगुरू फादर अल्फ़्रेंट मिरीडा, संत फ्रान्सिस डी सेल्स चर्च प्रमुख धर्मगुरू फादर मॅथ्यू रॉड्रिग्ज, क्राईस्टकिंग चर्च प्रमुख धर्मगुरू फादर राजेश परेरा, पास्टर शशिकांत गोरे, पास्टर प्रभाकर पवार, पास्टर प्रशांत गोरडे, सर्व चर्च समिती सदस्य प्रमुख जॉन फर्नाडिस, मार्कस पंडित, जो रोड्रिग्ज, फिलिप गोडा, अँथॉनी फर्नाडिस, अब्राहम आढाव, नितीन बारस्कार, राजेश फर्नाडिस, डिव्हाईन चर्च, मॅथ्यू व बिजू व लिंगायत समाजाचे संजय ढोले, मल्लिकार्जुन सर्जे, संतोष याडवाडे, विलास हैलकर, तमन्ना बडोळे, बसू कलसगोंडा, बसवराज वालेक आदि उपस्थित होते.