Walmik Karad News | वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात; धनंजय मुंडेंच्या मदतीने केला हार्वेस्टर मशीन घोटाळा, कोट्यवधींची फसवणूक

बीड : Walmik Karad News | एकीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) वाल्मिक कराड अडचणीत आला आहे. त्यातच आता थेट धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) जवळीकीचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडवर आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडने ऊस तोडणीच्या हार्वेस्टरसाठी ३६ लाखांचे अनुदान मिळवण्याचे आमिष दाखवून तब्बल १४१ शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ९ लाख रुपये याप्रमाणे कोट्यावधी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्याने केला आहे.
वाल्मिक कराडने शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची भेट घालून दिल्याचा व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. पंढरपूरमध्ये फसवणूक झालेल्या १९ हार्वेस्टर मालकांचे जबाब नोंदवण्यात आल्याने कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. १४१ हार्वेस्टरच्या अनुदानासाठी कराडने ५ हजार १४१ लोकांकडून कोट्यावधी रुपये उकळल्याचा आरोप करत आमदार सुरेश धसांनी कराडसह मुंडेंवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हार्वेस्टर घोटाळ्याची चौकशी करणार का? आणि कराड दोषी असेल तर त्याला शिक्षा होणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.