Dhanori Pune Crime News | पत्नी, सासुच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन केली आत्महत्या, धानोरीतील घटना

पुणे : Dhanori Pune Crime News | पत्नी, सासु, मेव्हणी यांच्याकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून एका तरुणाने राहत्या घरी गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रफुल्ल हरिचंद्र कदम (वय ३५, रा. सत्यम राजयोग, धानोरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत त्याचे वडिल हरिचंद्र गोंविद कदम (वय ६०, रा. सत्यम राजयोग, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पत्नी मृनाली प्रभुल कदम (वय २७), सासु स्वाती सुभाष सकपाळ (वय ५५) आणि मेव्हणी पल्लवी सुभाष सकपाळ (वय २५, रा. संभाजीनगर, एमआयडीसी, पिंपरी चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धानोरीतील सत्यम राजयोग येथे ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा प्रफुल्ल कदम हा एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याचा २०२० मध्ये मृनाली हिच्याबरोबर विवाह झाला होता. पत्नी, सासु आणि मेव्हणी या त्याला नेहमी त्रास देत होत्या. प्रफुल्ल हळव्या स्वभावाचा होता. त्यामुळे त्यांच्याकडून होत असलेल्या जाचाचा त्याच्या मनावर परिणाम होत होता. या त्रासाला कंटाळून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईट नोट लिहून ठेवली होती. त्यात पत्नी, सासु, मेव्हणीच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले (PSI Padamraj Gample) तपास करीत आहेत.