Chandan Nagar Pune Crime News | पुणे: दोन्ही मुली झाल्याने तोंडी तलाक देऊन काढले घराबाहेर; पतीने केले दुसरे लग्न, 5 जणांवर मुस्लिम महिला विवाह सरंक्षण हक्क कायद्यानुसार गुन्हा दाखल

पुणे : Chandan Nagar Pune Crime News | त्यांना मुलगा हवा होता. पण तिला दोन्ही मुली झाल्याने त्याने तीन वेळा तलाक तलाक तलाक म्हणून तिला तलाक दिला. तुझा व तुझ्या मुलींचा माझेशी काही संबंध नाही, असे बोलून त्यांना घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर त्याने दुसरा विवाह केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत २९ वर्षाच्या पिडिताने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिचा पती (वय ४०), सासु (वय ५९), नणंद (वय ३५), दीर ३१) आणि पतीची नवीन पत्नी (वय ३०) यांच्यावर मुस्लिम महिला विवाह सरंक्षण हक्क कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै २०१४ ते ३ जानेवारी २०२५ पर्यंत सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सासरी नांदत असताना सर्व आरोपींनी मिळून फिर्यादीस माहेरहून पैसे घेऊन ये, म्हणून छळ केला. तसेच त्यांना मुलगा पाहिजे होता. पण फिर्यादीस दोन्ही मुली झाल्याने शारीरीक व मानसिक त्रास देऊन मारहाण व शिवीगाळ केली. फिर्यादीचे पतीने फिर्यादीस तीन वेळा तलाक, तलाक, तलाक असे म्हणून तलाक दिला. तुझा व तुझ्या मुलींचा माझेशी काही संबंध नाही, असे बोलून फिर्यादी व त्याचे दोन्ही मुलांना घरातून हाकलून दिले. फिर्यादी या त्यांचे घरी असताना फिर्यादीची नणंद, सासु, पतीची नवीन पत्नी तसेच दीर हे फिर्यादीचे घरात घुसले. सासु व नणंद यांनी फिर्यादीचे दोन्ही हात पकडून केस ओढून तू आमच्या विरोधात तक्रार करतेस का, असे बोलून शिवीगाळ केली. फिर्यादी व तिच्या मुलींना मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. याच फोनमध्ये मेसेज आहेत ना, असे बोलून फिर्यादीचा फोन फरशीवर आपटून फोडून नुकसान केले. मुलींकडे असलेले फोन फिर्यादीचे संमतीशिवाय घेऊन गेले. फिर्यादीचा दीर हे बॅट घेऊन त्यांना मारण्यासाठी अंगावर धावुन गेले. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील (PSI Ashwini Patil) तपास करीत आहेत.