Pune Politics News | शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुण्यात मोठा धक्का ! 5 माजी नगरसेवकांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश

Bala Oswal

पुणे : Pune Politics News | शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्राची आल्हाट यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण सुनील कांबळे राजेश पांडे शहराध्यक्ष धीरज घाटे हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मार्गावर या सर्वानी मार्गक्रमण केले याचा मनस्वी आनंद आहे भारतीय जनता पक्ष आज जगातील सर्वात मोठा पक्ष आहे तो समर्पित कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे आज प्रवेश केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणे समाजापपर्यत पोहोचवावी.

केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले पुणे शहरात भारतीय जनता पार्टीचा मोठा परिवार आहे या कुटुंबात नवीन सदस्यांचे सहर्ष स्वागत करतो. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले नव्या जुन्यांची सांगड घालून पक्ष वाढी साठी तुम्ही प्रयत्न कराल ही अपेक्षा आहे.