Chhatrapati Sambhajinagar Crime News | ऑनर किलिंगची धक्कादायक घटना! प्रेमप्रकरणातून चुलत भावाने १७ वर्षीय बहिणीला संपवलं

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar Crime News | प्रेम प्रकरणातून १७ वर्षीय चुलत बहिणीला २०० फूट डोंगरावरून खाली ढकलून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. नम्रता गणेश शेरकर (वय-१७) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर ऋषिकेश तानाजी शेरकर (वय-२५) असे खून केलेल्या भावाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील शहागड येथील मुलगी घर सोडून निघून गेली होती. घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीने शहागड पोलिसांना दिली होती. त्यानंतर घरच्यांची समजूत काढण्यासाठी मुलीला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते. त्यानंतर काकाचा मुलगा ऋषिकेश हा नम्रताला गोड बोलून खावडा डोंगरावर घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिला ढकलून दिले, त्यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.