Bibvewadi Pune Crime News | ‘केअर’ घेण्यासाठी ठेवलेल्या ‘केअरटेकर’नेच लांबविले 25 तोळे सोन्याचे दागिने; तीन महिन्यांनंतर उघडकीस आला गुन्हा, बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी

Bibvewadi Police Station

पुणे : Bibvewadi Pune Crime News | एकट्या राहणार्‍या वृद्ध महिलेच्या घरातून तब्बल २५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. घरातील नोकरांपासून घरी येणार्‍या सर्वांची पोलिसांनी चौकशी केली. या केअरटेकरकडेही पोलिसांनी चौकशी केली, पण तिने तेव्हा पोलिसांना थांगपत्ता लागू दिला नव्हता. उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांची पुन्हा तपासणी करताना पोलीस उपनिरीक्षक शंशाक जाधव (PSI Shashank Jadhav) यांना ही चोरी केअरटेकरनेच केल्याची बातमी मिळाली. त्यावरुन पोलिसांनी तिची पुन्हा चौकशी केली. त्यात मात्र तिने चोरी केल्याची कबुली दिली. (Arrest In Theft Case)

गायत्री सुनिल हातेकर (वय २४, रा. गणपती मंदिराजवळ, चव्हाणनगर, धनकवडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. हा प्रकार बिबवेवाडीतील विद्यासागर सोसायटीतील अर्थव बंगला येथे २६जून ते १ ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडला होता. अतुल श्रीकांत रावळ (वय ५४, रा. धनकवडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली होती. त्यांची आई मंगला श्रीकांत रावळ (वय ७१) या एकट्याच अर्थव बंगला येथे राहतात. त्यांच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले २५.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने कोणीतरी चोरुन नेले होते. १ ऑक्टोंबर रोजी फिर्याद दिली होती. त्यावेळी पोलिसांनी चौकशी केली. परंतु, त्यांच्या हाती काही लागले नव्हते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे (Sr PI Shankar Salunkhe) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यभार हाती घेतला. उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांची फेर तपासणी सुरु केली. त्यात पोलीस उपनिरीक्षक शंशाक जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी गायत्री हातेकर यांना ताब्यात घेतले. चौकशीत तिने त्यांच्या आईकडे केअर टेकर म्हणून कामाला असताना सप्टेबर २०२४ मध्ये कपाटातून सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीला गेलेल्या दागिन्यापैकी ८ लाख ७० हजार रुपयांची १४६ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त केली आहे.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ, पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अंमलदार आशिष गायकवाड, राहुल शेलार, नितीन कातुर्डे, हवालदार गोकुळा काटकर यांनी केली आहे.