Bibvewadi Pune Crime News | रागाने बघतो या कारणावरुन इंजिनिअर तरुणाचा कोयत्याने वार करुन उजव्या हाताचा पंजा तोडला; बिबवेवाडीतील भयंकर घटना

पुणे : Bibvewadi Pune Crime News | केवळ रागाने बघतो, या कारणावरुन एका अल्पवयीन मुलासह दोघांनी कोयत्याने वार (Koyta Attack) करुन एका इंजिनिअर झालेल्या तरुणाच्या उजव्या हातावर कोयत्याने इतका जोरात वार केला की त्याचा हाताचा पंजा तुटून पडला. तसेच त्याच्या मित्राच्या डोक्यावर, पायावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)
पियुष पाचकुडके (वय २२) असे या इंजिनिअर तरुणाचे नाव आहे. याबाबत गौरव राजेश मरकडे (वय २४, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सागर सरोज (वय २१, रा. वडकी नाला) याला अटक केली असून त्याच्याबरोबर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना बिबवेवाडीतील सुपर इंदिरानगर येथील शिवतेजस क्रीडा संघ चौकात सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव मरकड व त्यांचा मित्र पियुष यांना आरोपींनी बोलावून घेतले. ते शिवतेज क्रीडा संघ चौकात आले असताना त्यांनी दोघांवर कोयत्याने वार केले. पियुष याच्या उजव्या हाताचे पंजावर जोरात वार केल्याने त्याचा हाताचा पंजा तुटून हातापासून वेगळा झाला. त्याचे डोक्यावर व पायावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच गौरव याच्या डोक्यावर, खांद्यावर व दंडावर वार करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे तपास करीत आहेत.
गेल्या वर्षी मे २०२३ मध्ये बिबवेवाडीतील सुखसागरनगर येथे किरकोळ वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करुन त्याचा पंजा तोडला होता. सुदैवाने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करुन मनगटापासून तुटलेला पंजा पुन्हा जोडला होता.