Wanwadi Pune Crime News | बनावट कागदपत्रे कोर्टात सादर करुन फसवणूक करणाऱ्या जामीनदारास अटक; वानवडी पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई

पुणे : Wanwadi Pune Crime News | खुनाचा प्रयन्न, दरोडा टाकणे, जबरी चोरी, वाहन चोरी, लुटालुट करणे, असे गंभीर गुन्हे असलेल्या टोळीतील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी बनावट नावे धारण करुन बनावट कागदपत्रे (Fake Documents) सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्या बनावट जामीनदाराला वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) सापळा रचून अटक केली आहे. (Cheating Fraud Case)
संतोषकुमार शंकरराव तेलंग Santoshkumar Shankarao Telang(वय ३२, रा. शेवाळवाडी, हडपसर) असे या बनावट जामीनदाराचे नाव आहे. ही कारवाई वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे असलेल्या लष्कर न्यायालयात शनिवार सायंकाळी ५ वाजता करण्यात आली.
या बाबत पोलीस अंमलदार सोमनाथ पोपट कांबळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बच्चनसिंग जोगिंदरसिंग भोंड हा तिलकसिंग टाक टोळीतील सदस्य आहे. या टोळीवर खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रे बाळगणे, दरोडा टाकणे, वाहन चोरी, जबरी चोरी, येणार्या जाणार्या लोकांना कोयते दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी करणे, लहान व्यावसायिक व दुकानदार तसेच पथारीवाले यांना दमदाटी करुन फुकट वस्तू घेऊन जाणे असे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत. गेल्या वर्षी या टोळीतील १० जणांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
त्यात बच्चनसिंग भोंड याचाही समावेश आहे. सध्या तो येरवडा तुरुंगात आहे. त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये जामीन मिळावा, म्हणून आरोपी संतोष तेलंग याने खोटे नाव धारण करुन लष्कर न्यायालयात अॅड. जाधव यांच्या मार्फत जमीन अर्जासोबत बनावट रेशनकार्ड, सात बारा उतारा जोडून सादर केला होता. बनावट कागदपत्रांद्वारे आरोपीला जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती वानवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी सापळा रचून संतोषकुमार तेलंग याला पकडले. त्याच्याकडील बनावट कागदपत्रे जप्त केली. त्यानंतर न्यायालयाच्या आवारात पार्क केलेल्या मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये त्याचे स्वत:कडे बनावट आधार कार्ड, बनावट रेशन कार्ड व इतर ही कागदपत्रे मिळून आली. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे (PSI Dhanaji Tone) तपास करीत आहेत.