Shikrapur Pune Accident News | पुणे : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, शाळेत जाणाऱ्या मुलांना चिरडलं; बापासह 2 मुलांचा जागीच मृत्यू, ट्रकवरील ड्रायव्हर मद्यधुंद असल्याचा संशय

पुणे / शिक्रापूर (सचिन धुमाळ) : Shikrapur Pune Accident News | पुणे जिल्ह्याच्या चाकण शिक्रापूर रोड वरती पिंपळे जगताप जवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये बापलेकांसह दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, ट्रकवरील ड्रायव्हर मद्यधुंद असल्याचा संशय व्यक्त्त करण्यात येत आहे.
दुचाकीवरून शाळेमध्ये मुलांना सोडण्यासाठी जाणाऱ्या तिघांना चिरडल्याची घटना शिक्रापूर जवळील पिंपळे जगताप येथे घडली आहे. यामध्ये भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी ट्रम्पो चालकाला ताब्यात घेतलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर – चाकण महामार्गावर सकाळी ट्रम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. शाळेमध्ये मुलांना सोडण्यासाठी जात असताना चिमुकल्यांवर काळाने घाला घातला. दुचाकीवरून चाललेल्या एका युवकासह दोन चिमुकल्यांना ट्रकने चिरडले. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांसह उप विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी धाव घेतली
या घटनेमुळे परिरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे . घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
पशु खाद्य वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये गणेश खेडकर या तरुणासह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. गणेश दोन मुलांना दुचाकीवरून शाळेमध्ये सोडण्यासाठी घेऊन जात होता. त्याचवेळी भरधाव ट्रम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये ट्रम्पोने तिघांनाही चिरडले. शाळेमध्ये पोहचण्यापूर्वीच मुलांना आपला जीव गमवावा लागला.
गणेश खेडकर या तरुणासह तन्मय खेडकर आणि शिवम खेडकर अशी मृतांची नावं आहेत. तन्मय तिसरीमध्ये शिकत होता तर शिवम दुसरीमध्ये शिकत होता. या अपघातानंतर नागरिक संतप्त झाले आहेत. शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.