Santosh Deshmukh Murder Case | संतोष देशमुख हत्या प्रकरणी 5 जानेवारीला पुण्यात मोर्चा, मनोज जरांगेंची घोषणा

Manoj Jarange Patil

पुणे : Santosh Deshmukh Murder Case | बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येवरून राज्यात असंतोष निर्माण झाला आहे. सर्व स्तरातून त्यांच्या न्यायाची मागणी केली जात आहे. अशातच मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी उद्या (दि.५) पुण्यात मोर्चा होणार असल्याची घोषणा करत मराठा बांधवांना एकत्र जमण्याचे आवाहन केले आहे. (Morcha In Pune)

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आधी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर आता परभणीत मोर्चा काढला आहे. यावेळी अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. यात मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.

“धनंजय देशमुखांना धमक्या येत आहेत. जर आता देशमुख कुटुंबालाल धमक्या आल्या तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरकू देणार नाही. तसेच या प्रकरणातील आरोपी सुटले तर त्यांना घरात घुसून मारू”, असा आक्रमक पवित्रा मनोज जरांगेंनी घेतला आहे.

मनोज जरांगे म्हणाले, ” या प्रकरणात मी आजपर्यंत कुणाचे नाव घेतले नाही. मात्र आज मी थेट नाव घेऊन बोलत आहे. आता देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर धनंजय मुंडेंना फिरू देणार नाही. आमच्या भावाचे जाणे आम्ही सहन केले. पण आता देशमुख कुटुंबाचा त्रास सहन होणार नाही. पुण्यात आरोपींना कोणी सांभाळले आहे? गंभीर गुन्ह्यातील सगळे आरोपी पुण्यात का सापडतात? हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपींची नार्को टेस्ट व्हायला हवी”, असे मनोज जरांगे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान बीड, परभणीनंतर आता पुण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता पुण्यात मोर्चा होणार आहे. यावेळी मराठा बांधवांना जमण्याचे आवाहन केलं आहे. या मोर्चासाठी आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर हे देखील उपस्थित आहेत. यावेळी त्यांनीही जोरदार हल्लाबोल चढवला आहे.