Suresh Dhas On Beed Guardian Minister | बीडच्या पालकमंत्री पदावर आमदार सुरेश धस यांचे सूचक वक्तव्य; म्हणाले – “पहिली पसंती मुख्यमंत्र्यांना, अजित पवार झाले तर…”

बीड: Suresh Dhas On Beed Guardian Minister | वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वीकारावे अशी मागणी होत आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज बीड च्या पालकमंत्री पदाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीडचे पालकमंत्री पद स्वीकारले तरी आपली हरकत नसल्याचे म्हंटले आहे.
बीडचे पालकमंत्रीपद अजित पवार यांनी स्वीकारावे अशी मागणी होत आहे. त्यावर बोलताना सुरेश धस म्हणाले, ” आमची पहिली पसंती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे आणि जर मुख्यमंत्री नाहीत झाले तर आम्हाला अजित पवार झाले तरी चालतील. आम्हाला काही अडचण नाही.
अजित पवार आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर ते जिल्ह्याला सुतासारखे सरळ करतील, कारण अजित पवारांच्या हाताखाली मी काम केले आहे. वेड्या वाकड्या गोष्टी त्यांना जमत नाहीत. ते स्पष्ट सांगतात की हे भंगार आहे हे करू नका”, असे सुरेश धस यांनी म्हंटले आहे.