Raigad Accident News | रायगड : महाड शहराजवळील वीर रेल्वे स्टेशनजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू , 2 जण जखमी

रायगड: Raigad Accident News | महाड शहराजवळील वीर रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, तर अन्य तिघे जखमी झाले झाल्याची घटना समोर आली आहे. सूर्यकांत सखाराम मोरे (रा-नवेनगर महाड), साहिल नथुराम शेलार आणि प्रसाद रघुनाथ नातेकर (दोघेही रा- कुंभारआळी महाड) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

समीर सुधीर मुंडे (रा- दासगाव, महाड) आणि सुरज अशोक नलावडे (रा- चांभारखिंड, महाड) हे दोघे जखमी झाले असून उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे, तर शुभम राजेंद्र मातळ याच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान उपचारावेळी मुंबई येथे हलविण्यात आलेल्या एका जखमीचाही मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे ६ जण महाडकडून लोणेरे येथे स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MHO6BE4041 ने जात होते. रात्री १२:३० वाजताच्या सुमारास गाडीतील इंधन संपल्यामुळे गाडी वीर रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपुलावर उभी करण्यात आली. यावेळी चिपळूणहून पनवेलकडे जाणाऱ्या भरधाव टोईंग व्हॅन क्रमांक MH14CM 309 ने स्कॉर्पिओला पाठीमागून जोरात धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, स्कॉर्पिओ गाडी उड्डाणपूला लगतच्या सर्विसरोडवरून खाली जवळपास शंभर फूट अंतरावर शेतात फेकली गेली. अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी टोइंग व्हॅनच्या चालकास ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.