Pune Guardian Minister | अजित पवार दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले – “बीडचे पालकमंत्रीपद हे पूर्वीपासून…”

मुंबई : Pune Guardian Minister | महायुती सरकारच्या (Mahayuti Govt) मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून चर्चा सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्री पद जाणार, हे तर निश्चित समजले जात आहे. पण त्यासोबत आणखी एका जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांकडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

बीडमध्ये झालेल्या संतोष देशमुख खून (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचे आणि वाल्मिक कराडचे (Walmik Karad) जवळचे संबंध असल्याचे दिसून येत आहे. मात्र खून प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झालेला आहे. यामुळे विरोधी पक्षासह सत्तापक्षाचे आमदार धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) मंत्रिपदाचा राजीनामा मागत आहेत.

मात्र धनंजय मुंडे यांनी ‘माझा काय दोष?’ असे म्हणत राजीनाम्यावर प्रत्युत्तर दिले. संतोष देशमुख खून प्रकरणातले आरोपी, इतर बंदुकधारी तरुण, खंडणीचे प्रकरण या सगळ्यात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बीडचे पालकमंत्रीपद राहणार नाही, असे दिसून येत आहे.

अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद घ्यावे, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी केली आहे. तसेच प्रकाश सोळंके, सुरेश धस (Suresh Dhas) यांनी सुद्धा अजित पवारांच्या नावाविषयी अडचण नाही. त्यामुळे तेच बीडचे पालकमंत्री होतील, अशी आता चर्चा सुरु आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले , “बीडचे पालकमंत्रीपद हे पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. आताही त्यांनी त्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच पालकमंत्री पद जाईल. मात्र पालकमंत्री कोण होणार?, याबाबत राष्ट्रवादी पक्ष निर्णय घेईल.”