Mira Road Mumbai Crime News | नववर्षाच्या पार्टीत मोठ्या आवाजात गाणी वाजवल्याच्या वादातून एकाची हत्या, एकजण गंभीर जखमी

मुंबई: Mira Road Mumbai Crime News | नववर्षाच्या पार्टीवेळी मोठ्या आवाजात गाणी वाजवल्याच्या वादातून एकाची हत्या झाल्याची घटना मीरा रोडवरील म्हाडा हाउसिंग कॉम्प्लेक्स येथून समोर आली आहे. मारहाणीत डोक्याला मार लागल्याने राजा परियार (वय- २३) याचा मृत्यू झाला आहे. ही घटना (दि.१) पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. (Murder Case)
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या वर्षानिमित्त मध्यरात्री पार्टी सुरू होती. या पार्टीत पहाटे ३ वाजताच्या सुमारास मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यावरून वाद झाला. आशिष जाधव, अमित जाधव, प्रकाश जाधव आणि प्रमोद यादव यांनी लाकडी दांडक्याने राजा परियारला मारहाण केली. राजासोबत विपुर राय नावाच्या तरुणावरही चौघांनी हल्ला केला.
राजा परियार याच्यासह विपुल राय यांच्या तोंडावर लोखंडी कड्याने मारहाण करण्यात आली होती. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी राजा परियारचा मृत्यू झाला तर विपुलची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी काशीमिरा पोलिसांनी आरोपी आशिष जाधव, अमित जाधव, प्रकाश जाधव, प्रमोद यादव यांना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.