Lonikand Pune Crime News | पुणे : प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीचा खुनाच्या प्रकार 56 दिवसांनी उघडकीस; मृतदेह टाकला दिवेघाटात, खुनानंतर केले दुसर्‍या मुलीशी लग्न

3rd January 2025

पुणे : Lonikand Pune Crime News | अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध (Love Affair) असताना दुसर्‍या मुलीशी लग्नाची तयारी त्याने केली होती. त्यातून झालेल्या वादातून त्याने अल्पवयीन मुलीचा खुन केला (Murder Case). त्यानंतर मित्राच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरुन दिवे घाटात टाकून दिला. त्यानंतर काहीही झाले नाही असे भासवत त्याने दुसर्‍या मुलीशी विवाह केला. मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या हरविल्याची तक्रार दिली होती. तिचा मृतदेह दिवे घाटात (Dive Ghat) सापडला. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. बेपत्ता मुलीच्या खुनाचा गुन्हा तब्बल ५६ दिवसांनी उघडकीस आला. लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) दोघांना अटक केली.

बालाजी रामराव हिंगे Balaji Ramrao Hinge (वय २५) आणि त्याचा मित्र सचिन संजय रणपिसे Sachin Sanjay Ranpise (वय २६, दोघे रा़ फुलगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजीचे एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. तरीही तो दुसर्‍या मुलीशी विवाह करण्याच्या तयारीत होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी बालाजी व ही मुलगी एकत्र बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. तेव्हा त्याने तिचा खुन केला. इकडे मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबियांनी २ नोव्हेंबर रोजी हरविल्याची तक्रार लोणीकंद पोलीस ठाण्यात दिली. तिचा शोध घेतला जात होता. परंतु, तिचा तपास लागत नव्हता. त्यानंतर ५६ दिवसांनी तिचा मृतदेह दिवे घाटात टाकल्याचा पोलिसांना सुगावा लागला. २८ डिसेंबर रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लोणीकंद पोलिसांनी या खुनाबद्दल दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात त्यांनी खुनाची कबुली दिली.

मुलीचा खुन केल्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह दोन दिवस एका वाहनात ठेवला. त्यानंतर दोघे आरोपी मृतदेह घेऊन दिवे घाटात गेले व त्यांनी एका ठिकाणी मृतदेह पोत्यात टाकून तो घाटात फेकून दिला.

बालाजी याने या मुलीचा खुन करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर काहीच झाले नाही, अशी त्याची वागणूक होती. त्यानंतर त्याने ठरल्याप्रमाणे १५ दिवसात दुसर्‍या मुलीशी विवाह केला. त्यावेळी नवरदेव असलेल्या बालाजीने एका मुलीचा खुन केला आहे, याची कोणालाच कल्पना नव्हती.