Wagholi Pune Crime News | पुणे: मुलीशी बोलतो या कारणावरुन वडिल आणि भावांकडून युवकाचा खून; वाघोलीतील वाघेश्वरनगरमधील मध्यरात्रीची घटना

पुणे : Wagholi Pune Crime News | पूर्वी मुलीशी बोलत असतो, या कारणावरुन मुलीच्या वडिल, भावांसह तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन लोखंडी रॉड, दगड डोक्यात घालून एका १७ वर्षाच्या युवकाचा खून केला. (Wagholi Murder Case)
नितीन पेटकर (वय ३१), सुधीर पेटकर (वय ३२), लक्ष्मण पेटकर (वय ६०, सर्व रा. वाघेश्वरनगर, गोरे वस्ती, वाघोली) यांना ताब्यात घेतले आहे. गणेश वाघु धांडे (वय १७, रा. गोरे वस्ती, वाघेश्वरनगर, वाघोली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडिल वाघु मारुती धांडे (वय ६४, रा. वाघेश्वरनगर, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना गोरे वस्तीतील पेटकर यांचे घरासमोर २ जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश धांडे हा इतर मित्रासोबत मोटारसायकलवरुन गोरे वस्ती येथील घरी येत होता. गणेश हा आरोपींच्या मुलीसोबत पूर्वी बोलत होता, याचा राम मनात धरुन तिघांनी गणेश यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी रॉड व दगड डोक्यात मारुन गणेश याचा खुन केला. सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करीत आहेत.