Sangli Crime News | सख्ख्या भावांमध्ये सुरु असलेली भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून; संशयित हल्लेखोर अटकेत

सांगली : Sangli Crime News | दोन सख्ख्या भावांमध्ये सुरु असलेली भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना समोर आली आहे. सचिन सुभाष लोंढे (वय-३७, पेठ, ता-वाळवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अण्णा भाऊ साठे नगर परिसरात मंगळवारी रात्री ८:३० च्या सुमारास ही घटना घडली. (Sangli Murder Case)
सचिन लोंढे याच्या खूनप्रकरणी भाऊ राजेंद्र सुभाष लोंढे (मूळ रा. पेठ, सध्या रा. आष्टा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी संग्राम कमलाकर शिंदे (वय २६, रा. साठेनगर, पेठ) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. संशयित हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री शरद कमलाकर शिंदे हा आपल्या बहिणीसोबत घराकडे निघाला होता. यावेळी मद्य प्राशन केलेल्या संग्राम याने त्याचा भाऊ शरद याच्यासोबत भांडण करण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत होता. त्यावेळी तेथून निघालेल्या सचिन लोंढे याने या दोन भावांमधील भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. त्याचा संग्राम याला राग आला. या रागाच्या भरात त्याने चाकूसारखे धारदार हत्यार काढून थेट सचिन लोंढे याच्या छातीवर वार केला. हा एकच वार वर्मी लागून सचिनचे फुफ्फुस निकामी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.