Pune News | सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ! चपाती आणि भाकरी खाणे आता महागणार, पीठगिरणी मालकांचा दरवाढीचा निर्णय

पुणे : Pune News | रोजच्या जेवणात असणारी चपाती आणि भाकरी खाणे आता महागणार आहे. त्याचे कारण म्हणजे चपाती आणि भाकरीसाठी गहू- ज्वारीच्या दळणाचे दर वाढविण्याचा निर्णय पुणे शहर- जिल्हा पीठ गिरणी मालक संघाने घेतला आहे.

पीठ गिरणी मालक संघाच्या हडपसर विभागाचे अध्यक्ष दिलीप रणनवरे यांच्या हस्ते नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी वाढत्या वीज बिलामुळे दळणाचे दरसुद्धा वाढविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तो प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानुसार दळणाचे दर प्रती किलो ८ रुपये, तर सर्व प्रकारच्या डाळी दळणाचे दर प्रती किलो १० रुपये करण्यात आले आहेत.

नवे दर १ जानेवारीपासून लागू करण्यात आले आहेत. वीज बिलामध्ये झालेली वाढ आणि दळण गिरणीच्या स्पेअर पार्टमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन ही दळणाची दरवाढ करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रणनवरे यांनी सांगितली. यावेळी उपाध्यक्ष अमोल मेमाणे, सचिव प्रमोद वाल्हेकर, सदस्य दत्तात्रय घुले, गणेश माने, आदी उपस्थित होते.