New Year Celebrations Pune | नववर्षाचे स्वागत करताना 2633 पुणेकरांवर 20 लाखांचा दंडाचा बोजा

पुणे : New Year Celebrations Pune | नववर्षाचे स्वागत करताना वाहतुकीचे विविध नियमांचे उल्लंघन करणार्या २ हजार ६३३ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्यावर १९ लाख ८१ हजार ४५० रुपयांचा दंड ठोठावला आहे. मद्य प्राशन करुन गाडी चालविल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला होता. त्यामुळे नववर्षाचे स्वागत करताना दारु पिऊन गाडी चालविताना पकडलेल्यांची संख्या यंदा घटली आहे. यंदा केवळ ८५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. (Pune Police News)
वाहतूकीच्या ओघाला अडथळा आणल्याबद्दल तब्बल ९०२ वाहनचालकांवर यंदा कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे वाहतूकीला बाधा आणण्यावर प्रथमच कारवाई करण्यात आली आहे. त्या खालोखाल वनवेमध्ये उलट दिशेने आलेल्या ६३२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय इतर मोटार वाहन कायद्याखाली ५५२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ट्रिपल सीट जाणार्या १७६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूकीच्या मुक्त प्रवाहात अडथळा आणणे – ९०२
विना हेल्मेट – २३
सिग्नल तोडणे – ११८
वनवेमध्ये शिरणे – ६३२
विना एम डी एल – २३
झेब्रा क्रॉसिंगवर थांबणे – ४
विना सीटबेल्ट – १०
विना गणवेश – २
ड्रंग अँड ड्राईव्ह – ८५
ट्रिपल सीट – १७६
मोबाईलवर बोलणे – ४९
धोकादायक ड्रायव्हिंग – ५६
इतर मोटर वाहन कायदा – ५५२
एकूण – २६३३ दंड-१९८१४५० रुपये