Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेवरून मंत्री आदिती तटकरेंचे महत्वाचे भाष्य; म्हणाल्या – ‘…तर ‘या’ लाभार्थी महिला अपात्र ठरणार’

मुंबई : Ladki Bahin Yojana | विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला आहे. दरम्यान आता या योजनेला घेऊन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर, तिच्या अर्जाची छाननी करण्यात येईल. त्यानुसार निकष बाह्य भरलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

आदिती तटकरे म्हणाल्या, “सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही. तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची छाननी करणार नाही. उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेले असेल तर त्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत. तसेच चारचाकी वाहन असलेल्या महिला अपात्र ठरतील, आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेस पात्र नाहीत. आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळे असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला अपात्र ठरेल”, असे आदिती तटकरे यांनी म्हंटले आहे.