Devendra Fadnavis News | आता मंत्रालयामध्ये सहजासहजी प्रवेश मिळणार नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

मुंबई : Devendra Fadnavis News | मंत्रालयातील सुरक्षा आणि सुव्यव्यवस्था यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कुणालाही आता मंत्रालयामध्ये सहजासहजी प्रवेश मिळणार नाही. त्यासाठी आता डिजिटल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मंत्रालय सुरक्षा आढावा बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबत माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “यापुढे मंत्रालयात फेस आयडीद्वारे प्रवेश मिळणार आहे. ज्या मजल्यावर काम असेल तिथेच परवानगी मिळेल, त्या व्यतिरिक्त इतर मजल्यावर जाता येणार नाही. ज्या विभागात काम, तिथेच मिळणार प्रवेश मिळणार असून अभ्यागतांना इतर ठिकाणी जाता येणार नाही.

मंत्रालय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा महत्वाचा निर्णय झाला आहे. क्युआर कोड स्कॅन करुन प्रवेश मिळेल. जवळपास पुढील दोन महिन्यात ही सिस्टिम कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असेल”, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे कोण किती वेळ मंत्रालयात होते, काय काम होतं, काम झालं की नाही? एका कामासाठी किती चकरा मारल्या? याचा सगळा डेटा साठवला जाणार आहे.