Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘काय बडबड लावली आहे, तुम्ही टोळी करुन काय बेत करता’; दोघा तरुणांनी चाकूने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

Marhan

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | कामावरुन आल्यावर रुमपार्टनर, गावाकडील मुलांबरोबर बोलत असताना शेजारील तरुणांनी येऊन काय बडबड लावली आहे, तुम्ही टोळी करुन काय बेत करता आहात असे म्हणून तरुणावर चाकूने वार (Stabbing Case) करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)

याबाबत कौशलकुमार सुनिल ठाकुर (वय २५, रा. रा़मंहिंद्रा कंपनी गेट नं. २, सुभाषवाडी, निघोजे, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संतोष अण्णा धांडे (वय २८), कृष्णा अर्जुन धांडे (वय २०, दोघे रा. सुभाषवाडी, निघोज, ता. खेड) यांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना फिर्यादीच्या घरी २९ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व आरोपी हे शेजारी शेजारी राहतात. फिर्यादी हे कामावरुन घरी आले. रुम पार्टनर राहुल ठाकूर, अमनकुमार ठाकूर व शेजारील गावाकडील मुलांमध्ये चर्चा चालु होती. तेवढ्यात शेजारी राहणारे संतोष धांडे व त्याचे साथीदार फिर्यादीजवळ आले व बोलु लागले की, काय बडबड लावली आहे. येथे तुम्ही टोळी करुन काय बेत करत आहात, असे म्हणून अल्पवयीन मुलाने फिर्यादीला मागून पकडून ठेवले. संतोष धांडे याने हातातील भाजी कापण्याचे सुरीने फिर्यादीच्या डोक्याच्या कपाळावर दोन्ही बाजूला वार करुन दुखापत केली. कृष्णा धांडे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन ते निघून गेले. पोलीस उपनिरीक्षक जायभाये तपास करीत आहेत.