Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे: ‘मी इथला भाई आहे, तुला जगायचा कंटाळा आला काय’? खंडणी न दिल्याने गुंडाने लाकडी दांडक्याने केली तोडफोड

पुणे / पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | मोबईल शॉपीचालक महिलेने २ हजार रुपयांची खंडणी (Extortion Case) न दिल्याने मी इथला भाई आहे, म्हणत एका गुंडाने दुकानाचे काऊंटर व बाहेर असलेल्या दुचाकीवर लाकडी दांडक्याने मारुन तोडफोड केली. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (Bhosari MIDC Police) या गुंडाला अटक केली आहे.

अशोक दुर्गा पवार (वय १९, रा. बालाजीनगर, एमआयडीसी भोसरी) असे या गुंडाचे नाव आहे. याबाबत एका महिला दुकानदाराने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार टेल्को रोडवरील बालाजीनगर येथी सीमरन मोबाईल शॉपी या झेरॉक्स शॉपमध्ये मंगळवारी सकाळी ११ व सायंकाळी पावणेपाच वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सीमरन मोबाईल शॉपी नावाने झेरॉक्सचे दुकान आहे. गुंड अशोक पवार हा सकाळी दुकानावर आला व त्याने २ हजार रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी खंडणी देण्यास नकार दिला. तेव्हा तो निघून गेला. त्यानंतर सायंकाळी पुन्हा आला. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली. मी इथला भाई आहे, तुला माहित नाही काय? तुला जगायचा कंटाळा आला काय?, असे मोठमोठ्याने ओरडून हातातील लाकडी दांडक्याने त्यांचे दुकानाचे काऊंटरवर व बाहेर उभा असलेल्या दुचाकीवर मारुन तिचे नुकसान करु लागला. तेव्हा परिसरातील लोक त्याला अडविण्यासाठी आल्यावर गुंड पवार त्यांना लाकडी दांडक्याने मारण्यास धावून गेला. तेव्हा ते घरात पळाले. त्याने परिसरात दहशत निर्माण करण्याकरीता त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने रस्त्याचे कडेला पार्क केलेल्या मोटारसायकलवर मारुन त्यांचे नुकसान केले. पोलीस उपनिरीक्षक इंगळे तपास करीत आहेत.