Pune Pimpri Chinchwad Crime News | आई भावाला मारहाणीपासून सोडविणे शेजारच्याला पडले महागात; अल्पवयीन मुलाने ५५ वर्षाच्या महिलेसह तरुणीला केली बेदम मारहाण

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन मुलगा त्याच्या आई व भावाला मारहाण करीत होता. हे पाहून शेजारी राहणारा तरुण भांडणे सोडविण्यास मध्ये गेला. याचा राग येऊन या मुलाने त्याच्या आईला दगडाने मारले. तिला वाचविण्यासाठी आलेल्या घरमालकाच्या बहिणीला दगडाने खांद्याला व दोन्ही हाताला मारुन जखमी केले. वाकड पोलिसांनी (Wakad Police) या १६ वर्षाच्या मुलावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Attempt To Murder)
याबाबत मिराबाई राजेंद्र बोरसे (वय ५५,रा. वडगाव मावळ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार थेरगावातील गणेशनगरमधील (Ganesh Nagar Thergaon) शिवकॉलनीत २९ डिसेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा संजय बोरसे याच्या घराजवळ फिर्यादीचे शेजारी राहणार्यांचा अल्पवयीन मुलगा आपल्या आई व भावाला मारहाण करीत होता. हे पाहून संजय बोरसे हा भांडणे सोडविण्यासाठी गेला. त्याचा राग येऊन या अल्पवयीन मुलाने धक्काबुक्की करुन जोरजोरात ओरडुन शिवीगाळ करत फिर्यादीच्या घराच्या दारावर लाथा मारुन तुम्हा ऐकेकाला सोडणार नाही.
तुम्हाला खल्लास करुन टाकील, असे हातात दगड घेऊन धमकावुन दहशत निर्माण केली. फिर्यादीच्या मदतीला आलेल्या घरमालकाची बहिण यांना या मुलाने हातातील दगडाने खांद्याला व दोन्ही हाताला मारुन जखमी केले. फिर्यादी जवळ आला व त्याने रागारागात आता तुला सोडणार नाही़ तुला खल्लास करुन टाकतो. तुझ्या मुलाला पण सोडणार नाही, असे म्हणून जीवे ठार मारण्याच्या इराद्याने त्याच्या हातातील दगडाने फिर्यादीचे उजव्या डोळ्याच्या खाली जोरात मारुन जखमी केले. फिर्यादीच्या डोळ्याखाली मार लागल्याने त्यांना चक्कर आली व अंधारी येऊन त्या खाली पडल्या. त्यांचा वाचविण्यासाठी त्यांची सून आली असता तिला धक्काबुक्की करुन हाताने मारहाण केली. हातामध्ये दगड घेऊन मध्ये जर कोण आला तर एकेकाला जिवंत सोडणार नाही, असे धमकावून दुसर्या मुलाच्या मोटारसायकलीवर बसून पळून गेला. सहायक पोलीस निरीक्षक गज्जेवार तपास करीत आहेत.