Pune Crime Court News | विद्यापीठाचे बनावट प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केल्या प्रकरणातील मुख्य आरोपीला जमीन मंजूर

पुणे : Pune Crime Court News | स्वारगेट पोलीस स्टेशन (Swargate Police Station) परिसरात जेधे चौक येथे बनावट खाजगी ॲम्डस विद्यापीठाचे व महाराष्ट्र शिक्षण मंडळ बोर्ड चे १० वी व १२ वी व पदवीचे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र खरे आहेत असे भासवून विद्यार्थ्यांची फसवणुक केली होती त्यामधील मुख्य आरोपी संदीप कांबळे याला स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून जेथे चौक, स्वारगेट येथे बनावट शैक्षणिक कागदोपत्रा सोबत रंगेहाथ पकडले होते (Fake Documents) व नंतर स्वारगेट पोलिसांनी मुख्य-आरोपी संदीप कांबळे यांच्या विरोधात स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद नं.१०७/२०२३ प्रमाणे भा.द.वी कलम. ४२०, ४६५, ४६८, ४७१, १९७, १९८, ४८२, ४८४,३४ व माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम. ६५, ६६(अ)(क)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करून दि. ०१ मे २०२३ रोजी पुणे पोलिसांनी सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक केली होती. (Cheating Fraud Case)
या गुन्हाचा तपास केला असता आरोपींची टोळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खोटे व बनावट शिक्षण केंद्र तयार करून विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये घेऊन पदवीची खोटे बनावट प्रमाणपत्र व तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ चे १० वी व १२ वी चे खोटे बनावट प्रमाणपत्र तयार करून अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याची बाब समोर आली व बनावट प्रमाणपत्र तयार करण्याचा सर्व प्रकार औरंगाबाद (संभाजीनगर) येथून चालत होता.
तसेच मुख्य-आरोपी संदीप कांबळे यांनी ॲड. राजेश चंदू वाघमारे (Adv Rajesh Chandu Waghmare) यांच्या मार्फत मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पुणे येथे दि. ०७ डिसेंबर २०२४ रोजी जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर ॲड. राजेश वाघमारे यांनी आरोपीच्या वतीने मे. न्यायालयात योग्य तो युक्तिवाद केला असता मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पुणे (श्रीमती. टी. एस गायगोले) यांनी ॲड. वाघमारे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला जमीन मंजूर केला. तसेच आरोपी हा मागील १ वर्ष ७ महिने पुणे येरवडा कारागृहात (Yerawada Jail) बंदी होता.