Nashik Crime News | डोक्यात दगड घालत चौघांनी सराईत गुन्हेगाराला संपवलं; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरात खळबळ

नाशिक : Nashik Crime News | शहरामध्ये चार जणांच्या टोळक्याने सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात दगड घालत निर्घृण खून (Murder In Nashik) केल्याचा प्रकार समोर आला आहे. लक्ष्मण पोपट घरे (वय-२८) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना क्रांतीनगर सार्वजनिक बांधकाम भवन या परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरात सर्वत्र नाके बंदीची कारवाई सुरू असताना क्रांती नगर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शेजारी मोकळ्या जागेत चार ते पाच संशयित मद्य पिऊन धिंगाणा घालत होते. याचा परिसरातील राहणारा लक्ष्मण घारे या सराईत सोबत या टोळक्यातील दोघा- तिघा संशयित सोबत पूर्वीचे वाद होते. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर टोळक्यातील काही जणांनी लक्ष्मणच्या डोक्यात दगड घालून हत्या केली.
नवीन वर्षाच्या प्रारंभी शहरात खुनाची घटना घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. टोळक्याकडून हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. दरम्यान या घटनेबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्या करणाऱ्या टोळक्यातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.