Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती; म्हणाल्या,…

मुंबई : Ladki Bahin Yojana | महायुती सरकारने (Mahayuti Govt) विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान या रक्कमेत वाढ करून ती २१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. मात्र अद्याप ही रक्कम वाढवण्यात आली नाही. डिसेंबर मध्ये १५०० रुपयांचाच हप्ता महिलांना मिळाला आहे.

लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. आता जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रातीआधी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळू शकतात. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिले जाणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी सांगितले आहे.

लाडकी बहीण योजनेत नव्याने १२ लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही, त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार असल्याचे सांगितले आहे. परंतु यासाठी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे. जर तुमचे बँक अकाउंट लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत. तसेच महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलांनी खोटी माहिती भरुन अर्ज केलेत त्यांना या योजनेत लाभ मिळणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.