Kolhapur Accident News | भरधाव ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू , पती गंभीर जखमी

Satara Accident News | Fatal accident in private bus-truck on Satara-Lonand route; Two dead, eight injured

कोल्हापूर : Kolhapur Accident News | महामार्गावर कोगनोळी माळभाग फाटा येथे भरधाव ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला आहे तर पती गंभीर जखमी झाला आहे. रेश्मा विल्सन मास्कारेन्हास (वय-४५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती विल्सन मरीयन मास्कारेन्हास (वय-५३, रा. नारायण नगर, तामगाव ता. करवीर) हे जखमी झाले आहेत.

रविवारी (दि.२९) रात्री ८ वाजताच्या सुमारास अपघात झाला. विल्सन हे पत्नी रेश्मा यांच्यासमवेत बेळगाव येथे लग्नकार्यासाठी गेले होते. तेथून तामगावकडे परतत होते. कोगनोळी जवळ दुचाकीला ट्रकने धडक दिली. यामध्ये रेश्मा यांना मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर विल्सन हे गंभीर जखमी आहेत.