Ashatai Pawar On Pawar Family | “शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत म्हणून विठुरायाला साकडं, वर्षभरात….”, अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांचे मोठे भाष्य (Video)

Sharad-Pawar-VS-Ajit-Pawar

सोलापूर : Ashatai Pawar On Pawar Family | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत (Mahayuti Govt) सहभागी झाले. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात अजित पवार यांनी आपली पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत पवार विरुद्ध पवार संघर्ष दिसून आला. आता नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी विठूरायाला दोन्ही पवार एकत्र येऊ दे असं साकडं घातलं आहे.

दोन्ही पवारांमध्ये वादाची ठिणगी कुठे पडली?

मे २०२३ च्या पहिल्या आठवड्यात शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवारांनी मी राजकारणात सक्रिय असेन पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडतो आहे असे जाहीर केले. त्या कार्यक्रमात अजित पवार यांचा आक्रमकपणा सगळ्यांनाच दिसून आला.

पुढचे अध्यक्ष अजित पवार होतील असे वाटत होते. मात्र तसे घडले नाही. सुप्रिया सुळेंकडे राष्ट्रीय पातळीवरची सूत्रे दिली गेली. अजित पवारांनाही हे अनपेक्षित होते. या नाराजीतूनच अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत जुलै २०२३ मध्ये ४१ आमदारांसह महायुतीत प्रवेश केला.

५ जुलै २०२३ च्या भाषणात अजित पवारांनी आपली खदखद बोलून दाखवली होती. आपल्यालाला कायमच कसं व्हिलन ठरवलं गेलं? यावरही त्यांनी भाष्य केलं होतं. तसेच शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत त्यांनी आता पक्षाची धुरा सक्षम खांद्यावर देऊन मार्गदर्शकाच्या भूमिकेत असायला हवं होतं अशीही अपेक्षा बोलून दाखवली. मात्र शरद पवारांकडूनही अजित पवारांना उत्तर देण्यात आले. यामुळे हा संघर्ष टोकाला गेला.

२०२३ प्रमाणेच २०१९ मध्येही असेच बंड अजित पवारांनी केले होते. पण ते मोडण्यात शरद पवार यशस्वी झाले होते. अर्थात पहाटेच्या शपथविधीचे सगळे पदर नंतर उलगडले. जे घडलं त्याची सगळी माहिती शरद पवारांना होती. २०२३ मध्ये मात्र असे झाले नाही.

४१ आमदारांसह अजित पवार महायुतीसह गेले. त्यामुळे शरद पवारांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली. नव्या नावासह आणि पक्षचिन्हासह लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला मोठे यश मिळाले. मात्र विधानसभेला मोठा फटका बसला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले.

त्यानंतर आता दोन्ही पवार एकत्र येतील असे वक्तव्य आशाताई पवार यांनी केले आहे. आशाताई पवार म्हणाल्या, ” हे वर्ष सगळ्यांना उत्तम आणि चांगले जाऊदेत असं साकडं पांडुरंगाला मी घातलं आहे. शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येऊदेत असेही सांगितले आहे. मला वाटतं की वर्षभरात हे दोघे एकत्र येतील. शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत म्हणून मी प्रार्थना केली. पांडुरंग माझं ऐकणार असा विश्वास वाटतो. “