Walmik Karad | फडणवीस-मुंडेंच्या भेटीनंतर वाल्मिक कराडची शरणागती, पडद्यामागे काय घडलं? छत्रपती संभाजीराजेंच्या प्रश्नामुळे प्रकरणाला नवा राजकीय रंग

पुणे : Walmik Karad | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर (Santosh Deshmukh Murder Case) चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात (Pune CID Office) पोलिसांना शरण आले आहेत. त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान आता यावरून छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Chhatrapati) यांनी राज्य सरकार (Mahayuti Govt) आणि पोलीस प्रशासनावर (Maharashtra Police) अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
वाल्मिक कराडवर १४ गुन्हे दाखल असताना त्याला सुरक्षा का पुरवली गेली? जर तो निर्दोष असेल तर शरणागती पत्करायला २२ दिवसांचा कालावधी का लागला? कराडचे शेवटचे लोकेशन पुणे असतानाही पोलिसांनी त्याला अटक का केली नाही? देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि धनंजय मुंडेंमध्ये (Dhananjay Munde) काल काय चर्चा झाली, ज्यामुळे आज वाल्मिक कराडने शरणागती पत्करली? दरम्यान आता छत्रपती संभाजीराजेंच्या या प्रश्नामुळे या प्रकरणाला नवा राजकीय रंग मिळाला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ” वाल्मिक कराड शरण आला म्हणजे विषय संपला असा अर्थ होत नाही. उलट आता सरकारची जबाबदारी वाढली आहे. सीडीआर तपासला गेला पाहिजे. वाल्मिक कराड पुण्यात होता हे तीन दिवसांपासून पोलिसांना समजले कसे नाही? वाल्मिक कराडला शरण येण्यासाठी २२ दिवस का लागले?
तो जर शुद्ध आणि सरळ असता तर दुसऱ्या दिवशीच शरण आला असता. लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर, बँक खाती गोठवल्यानंतर शरण यायचे ही कोणती पद्धत? वाल्मिक कराडला मोक्का लावत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. कराड हा सात आरोपींच्या टोळीचा म्होरक्या आहे. धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद देऊ नये”, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हंटले आहे.