Pune Crime News | पुणे : पूर्ववैमनस्यातून घरात घुसून केली तोडफोड; टोळक्यांने महिलेसह शेजारच्यांना मारहाण करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : Pune Crime News | जुन्या भांडणाचा राग मनात धरुन घरात शिरलेल्या टोळक्याला पती न मिळाल्याने त्यांनी महिलेला बांबुने मारहाण (Marhan) केली. भांडणे सोडविण्यासाठी शेजारी राहणार्यांनी मध्यस्थी केली तर त्यांच्या डोक्यात बांबुने जोरात मारुन जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) सुरज कांबळे (रा. नांदेड फाटा), राकेश कांबळे (रा. नांदेड फाटा), चेतन गायकवाड (रा. एस आर ए कॉलनी, कात्रज), अक्षय तुपे (रा. राजेंद्र नगर, दत्तवाडी) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत प्रियंका रवी कर्डे (वय ३४, रा. एस आर ए कॉलनी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कात्रज येथील एसआरए कॉलनी रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात पूर्वी भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी लाकडी बांबु घेऊन आले. त्यांनी फिर्यादी यांना कोठे आहे तुझा नवरा रवि कर्डे, असे म्हणून शिवीगाळ करत घरात शिरले. त्यांनी फिर्यादीला लाकडी बांबुने मारहाण केली. घरातील टीव्ही व फिश पॉट फोडून नुकसान केले. तसेच ही भांडणे सोडविण्यासाठी शेजारील हनुमंत ढावरे हे आले असताना त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. राकेशा कांबळे याने ढावरे यांना तुझा काय यामध्ये संबंध. थांब तुला खल्लासच करतो, असे म्हणून त्याच्याकडील बांबुने त्यांच्या डोक्यात जोरात मारुन गंभीर दुखापत करुन जखमी केले आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.