Pune Crime News | उत्तर प्रदेश, बिहारचे लोण पुण्यात? रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलेंडर ठेवून घातपात करण्याचा प्रयत्न, लोकोपायलटच्या प्रसंगावधानाने टळली दुर्घटना

gas cylinder on the railway track

पुणे : Pune Crime News | उत्तर प्रदेश, बिहारमध्ये मागील काही महिन्यांपूर्वी रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलेंडर ठेवून रेल्वे गाड्यांना घातपात करण्याचे अनेक प्रयत्न झाले. सुदैवाने त्यात अतिरेक्यांना यश आले नाही. आता हे लोण पुण्यात आल्याचे दिसून आले आहे. उरळी कांचनजवळ रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलेंडर ठेवून रेल्वेला घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न सिकंदराबाद -पुणे शताब्दी एक्सप्रेसच्या (Secunderabad -Pune Shatabdi Express) लोकोपायलटच्या प्रसंगावधानाने उधळला गेला. उरळी रेल्वे स्टेशन (Uruli railway station) ते लोणी रेल्वे स्टेशन (Loni Railway Station) दरम्यान २९ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजता घडला.

याबाबत शरद शहाजी वाळके (वय ३८, रा. सार्थक रेसिडेन्सी, वाघोली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात (Uruli Kanchan Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उरुळी कांचन गावाचे हद्दीत रेल्वे विद्युत पोल किलोमीटर नंबर २१९/७-५ पुणे बाजुकडे लोणी काळभोर रेल्वे ट्रॅकवर घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद वाळके हे रेल्वे सुरक्षा दलामध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) सहायक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. सिकंदराबाद -पुणे शताब्दी एक्सप्रेस ही पुण्याकडे येत होती. या गाडीवर लोकोपायलट म्हणून आर टी वाणी हे काम करत होते. उरुळी कांचनहून गाडी पुण्याकडे पुढे निघाल्यावर एका रेल्वे विद्युत पोलजवळ रेल्वे ट्रॅकवर लाल रंगाची वस्तून ठेवली असल्याचे लोकोपायलट वाणी यांना लांबूनच दिसला. त्यांनी तातडीने गाडीचा वेग कमी केला. रेल्वेगाडी या सिलेंडरच्या अगदी जवळ येऊन थांबली. वाणी व ट्रेन मॅनेजर यांनी खाली उतरुन ट्रॅकवर असलेला सिलेंडरचे निरीक्षण केले़ प्रिया गोल्ड कंपनीचा लहान आकाराचा ३९०० किलोग्रॅम वजनाचा गॅस सिलेंडर भरलेल्या अवस्थेत होता. वाणी यांनी याबाबतची माहिती उरुळी कांचन रेल्वे स्टेशन मास्टर यांना कळविली. रेल्वे सुरक्षा दलाने तातडीने घटनास्थळी पोहचत हा गॅस सिलेंडर ताब्यात घेतला.

रेल्वे गाडी, रेल्वे प्रवाशांच्या जीवितास हानी पोहचविण्याच्या उद्देशाने व धोका निर्माण करण्याच्या हेतूने ठेवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक बाजगिरे तपास करीत आहेत.