Farmer Suicide Due To Bank Loan | बँकेच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून संपवलं जीवन

परभणी : Farmer Suicide Due To Bank Loan | शेतातील पिकांचे नुकसान व बँकेच्या कर्जाला कंटाळून ८ दिवसांपूर्वी किटकनाशक प्राशन केलेल्या फुलकळस येथील शेतकऱ्याचा (दि.३०) उपचारादरम्यान मृत्यू झाला. गजानन सखाराम धुळशेटे (वय-३१) शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील युवा शेतकरी गजानन याने बँकेकडून घेतलेल्या कर्जाला कंटाळून ८ दिवसांपूर्वी किटकनाशक प्राशन केले होते. त्यानंतर त्याला नातेवाईकांनी तात्काळ परभणी येथील एका रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याची तब्येत गंभीर होत असल्याने त्याला तेथून हैद्राबाद येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सोमवार (दि.३०) दुपारी १ वाजताच्या दरम्यान त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.