Bhondu Baba Arrested In Kalyan | ‘मला एकटीला खोलीत नेलं अन्….’ पीडितेनं सांगितली आपबिती, भोंदू बाबाविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : Bhondu Baba Arrested In Kalyan | कल्याणजवळील आंबिवली परिसरातुन धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका बाबाने अघोरी विद्येच्या नावाखाली मुलीसोबत अश्लील चाळे (Ashlil Chale) केले. भोंदू बाबाच्या संतापजनक कृत्याने पीडित मुलीने थेट पोलिसात धाव घेतली. या भोंदू बाबाचे नाव अरविंद जाधव असून खडकपाडा पोलीस ठाण्यात (Khadakpada Police Station) भोंदू बाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत मुलीने दिलेल्या माहितीनुसार, मी एका बाबाकडे माझा फॅमिली प्रॉब्लेम घेऊन गेले होते, पण त्या बाबाने माझ्याशी घाणेरडे कृत्य केले. मी माझ्या नातेवाईकाला घेऊन बाबाकडे गेले होते. मात्र, बाबाने नातेवाईकाला बाहेर बसायला सांगितले व मला एकटीला खोलीत ते घेऊन गेले.

तू खूप प्रॉब्लेममध्ये आहेस, मी तुझी समस्या सोडवतो असे म्हणत बाबाने माझ्या संपूर्ण शरिराला टच केले, प्रायव्हेट पार्टलाही हात लावला. दरम्यान, याप्रकरणी आपण पोलिसात फिर्याद दिली असून आरोपी बाबावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, नव्या कायद्यानुसार आपण आरोपीला अटक करु शकत नाही, असे पोलिसांनी म्हटले.

मुलीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा (Molestation Case) दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कल्याण-खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघचौरे (PI Amarnath Waghchoure) यांनी दिली आहे.