Warje Malwadi Pune Crime News | पुणे: धक्का लागल्याचा जाब विचारल्याने टोळक्याने तरुणाला मारहाण करुन डोळा केला निकामी

पुणे : Warje Malwadi Pune Crime News | घरी जात असलेल्या तरुणाला गाडीचा धक्का लागला़ त्याचा जाब विचारल्याने टोळक्याने तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण (Marhan) करुन त्याचा डोळा निकामी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत पवन टाक (वय २१, रा. मल्हार अपार्टमेंट, हिंगणे होम कॉलनी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गणेश हगवणे, समीर सय्यद, सागर पासलकर व त्याचे इतर ५ ते ६ साथीदार (सर्व रा. हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार हिंगणे होम कॉलनीतील हॉटेल कोळीवाडा, तसेच कामत हॉस्पिटल व योध्दा चौक येथे शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवन टाक हा त्याचे मित्र मैत्रिणीबरोबर जेवण करुन त्यांच्या रुमवर परत जात होते. यावेळी आरोपीची गाडी फिर्यादीच्या अंगाला लावली. या कारणावरुन त्यांच्या वाद झाला. तेव्हा गणेश हगवणे, समीर व सागर यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करुन हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. त्यांनी पुन्हा मारहाण केली. त्यात कोणीतरी फिर्यादी यांच्या डोळ्यावर बुक्का मारुन त्यांचा डोळा अंशत: निकामी केला. छोट्या वस्तूने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले आहे. पोलीस उपनिरीक्षक एस व्ही तरडे (PSI S V Tarde) तपास करीत आहेत.