Pune Traffic Updates | नव वर्षानिमित्त कॅम्प व डेक्कन परिसरातील वाहतूकीत बदल

Pune-Traffic-Police

पुणे : Pune Traffic Updates | नववर्षानिमित्त लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर तसेच डेक्कन परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असते. रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी वाढून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत तात्पुरतया स्वरुपात हा बदल करण्यात येणार आहे.

फर्ग्युसन कॉलेज रोड व जंगली महाराज रोड

फर्ग्युसन कॉलेज रोड : कोथरुड/कर्वे रोडकडून येणारी वाहतूक खंडोजीबाबा चौक या ठिकाणी बंद करुन लॉ कॉलेज रोड, प्रभात रोड व अलका टॉकीज चौक मार्गे वळविण्यात यईल.

जंगली महाराज रोड : जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक, गुडल चौक व इतर लेनमधून फर्ग्युसन कॉलेज रोडकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेप्रमाणे झाशी राणी चौक या ठिकाणी बंद करुन पुणे महानगर पालिका, ओंकारेश्वर मंदिर व शिवाजी रोड मार्गे वळविण्यात येईल.

महात्मा गांधी रोड परिसर :
वाय जंक्शन वरुन महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करुन ती कुरेशी मस्जिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.

ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक ही बंद करण्यात येणार आहे.
व्होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.

इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येईल.

सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक ताबूत स्ट्रीटमार्गे पुढे सोडण्यात येईल.
नो व्होईकल झोन (३१ डिसेबर सायंकाळी ५ ते १ जानेवारी पहाटे ५ वाजेपर्यंत)

फर्ग्युसन रोड : गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेटपर्यंत
महात्मा गांधी रोड : १५ ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर
अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी
३१ डिसेंबर व १ जानेवारी दरम्यान शहरात सर्व प्रकारचे जड /अवजड वाहनांना विशेषत: ट्रक, डंपर, मिक्सर, बल्कर, जे सी बी, रोड रोलर, मल्टी एक्ल वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे़ वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन इच्छित स्थळी जावे़
थेऊर फाटा, लोणी काळभोरपासून पुढे
हॅरीश ब्रीज खडकी
बोपखेल फाटा, विश्रांतवाडी
राधा चौक,बाणेर,
नवले ब्रीज, वारजे
कात्रज चौक, कात्रज
खडी मशीन चौक, कोंढवा
मंतरवाडी फाटा, फुरसुंगी
मरकळ ब्रीज पासून पुढे प्रवेश बंद राहील.