Hadapsar Pune Crime News | मोबाईल चोरताना 300 मीटर नेले फरफटत; 100 CCTV फुटेज तपासून तिघा चोरट्यांना केले गजाआड

पुणे : Hadapsar Pune Crime News | मोबाईल चोरत असताना विरोध केल्याने चालकाला चोरट्यांनी जवळपास ३०० मीटर फरफटत नेले होते. यात ते जखमी झाले होते. या चोरट्यांचा माग काढता हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) तब्बल १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून अखेर या चोरट्यांना गजाआड केले. (Arrest In Theft Case)
मंथन त्रिलोक पवार (वय १९, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), रोहित किरण वाणी (वय २१)आणि कृष्णा संजय वाणी (वय २०, दोघे रा. ताडीगुप्ता चौक, धायरकर वस्ती, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी हे डी पी रोडवरुन भगीरथी नगर सोसायटीकडे पायी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या तिघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावला. त्यास फिर्यादी यांनी विरोध केला असता चोरट्यांनी त्यांना ३०० मीटरपर्यंत फरफटत नेले. त्यामध्ये त्यांच्या डाव्या पायाला तसेच दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाली. गाडीवरील पाठीमागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादीस हाताला चावून जखमी केले होते.
या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्ह्याचे घटनास्थळ असलेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड यांनी पाहिले. त्यामध्ये तीन संशयित दिसून आले. या संशयितांचा माग काढत सुमारे १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्या आधारे तपास पथकाला मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल व त्यासाठी वापरलेली दुचाकी असा ७० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी Addl CP मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे (DCP Rajkumar Shinde), सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे, अमर काळंगे यांच्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार संदीप राठोड, सचिन जाधव, दिपक कांबळे, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, प्रशांत दुधाळ, निखील पवार यांनी केली आहे.