Santosh Deshmukh Murder Case | ‘धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायलाच हवा’, संभाजीराजेंचे टीकास्त्र म्हणाले – ‘अजितदादा परखड म्हणता मग त्यांना संरक्षण देताय, ते तुम्हाला पटतेय का’

Dhananjay Munde-Sambhaji Chhatrapati

बीड : Santosh Deshmukh Murder Case | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणावरून महाविकास आघाडीसह विरोधक महायुती सरकारवर (Mahayuti Govt) हल्लाबोल करीत आहेत. मनोज जरांगेंपासून (Manoj Jarange Patil) ते अंजली दमानिया (Anjali Damania) पर्यंत सर्वजण बीडमध्ये भेटी देत आहेत. मोर्चे काढले जात आहेत. यातच आता संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा मागत अजित पवारांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली, महाराष्ट्रामध्ये भीषण परिस्थिती झाली आहे. मला बोलायलाही लाज वाटते. महाराष्ट्राचे बीड झाले आहे, १९ दिवस झाले अजून अटक नाही, वाल्मिक कराड बेपत्ता आहे. अशी प्रकरण राज्याला परवडणारे आहे का, बीडमध्ये जे चालले आहे ते तुम्हाला पटते का?

बीडची गुन्हेगारी पाहून मी चकित झालो. स्वतः मुंडे यांचा हातात बंदुक घेऊन फोटो आहे, हे काय दहशत माजवण्याचा प्रकार आहे का? त्यांना मंत्रिपद देऊ नका असे माझे म्हणणे होते. धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड कुठे आहे, हे माहिती नसणे हे पटणारे नाही. मुंडेंचा राजीनामा घ्यायलाच हवा”, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.

ते पुढे म्हणाले, ” अजितदादा परखड म्हणता मग त्यांना संरक्षण देताय, ते तुम्हाला पटतेय का, महाराष्ट्रामध्ये काय चालले आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कौशल्य दाखवा, खऱ्या आरोपीला अटक करून दाखवा. कराड याला संरक्षण देणारे तिथले मंत्री यांची हकालपट्टी का झाली नाही? त्यांचा राजीनामा का घेतला नाही? हा आमचा सवाल आहे.

राज्यात हा बीड पॅटर्न कुठे होऊ नये याची दक्षता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घ्यावी. सरपंचाची हत्या होत आहे. आरोपींचा थेट संबंध दिसून येतो. त्यांचा कंपनीत भागीदारी आहे, त्यांचे सातबारा पुढे आले आहे”, अशा शब्दात संभाजीराजे यांनी निशाणा साधला आहे.