Sahakar Nagar Pune Crime News | दोघा सराईत गुन्हेगारांकडून 8 दुचाकी वाहने जप्त; सहकारनगर पोलिसांची कामगिरी

पुणे : Sahakar Nagar Pune Crime News | संशयास्पदरित्या जाणार्या यामाहा मोटारसायकलवरुन जाणार्या दोघांना पकडून त्यांच्याकडून सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police) २ लाख ४० हजार रुपयांची ८ चोरीची वाहने जप्त केली आहेत.
अन्वर सलीम शेख (वय २१, रा. नुरमंहमद मस्जिद गल्ली, सहकारनगर), फरीद लालापाशा सय्यद (वय १९, रा. नुर मंहमद मस्जिद गल्ली, दाते बसस्टॉप, सहकारनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या आरोपींवर हत्यार बाळगल्याचा गुन्हा सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल आहे. (Vehicle Theft Detection)
सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करीत असताना एका यामाहा गाडीवर दोघे जण बिकानेर चौकातून भरधाव जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी काही अंतरावर पाठलाग करुन दोघांना थांबविले. त्यांच्याकडील गाडी ही चोरीची होती. के के मार्केट भागात पार्क केलेली यामाहा चोरली असून ही गाडी विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. या आरोपींकडे अधिक चौकशी करता तयांनी आणखी सात वाहने चोरल्याचे सांगितले़. त्यांच्याकडून २ लाख ४० हजार रुपयांची ८ वाहने जप्त करण्यात आली आहेत. सहकारनगर पोलीस ठाण्याकडील वाहन चोरीचे ६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Arrest In Vehicle Theft)
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, विनायक एडके, महेश मंडलिक, अमित पदमाळे, सागर सुतकर, खंडु शिंदे, योगेश ढोले, महेश भगत, अभिमान बागलाने, बबलु भिसे, सचिन येनपुरे, नामदेव केंद्रे यांनी केली आहे.