Bhima Koregaon Shaurya Din Vijaystambha | भीमा कोरेगाव शौर्यदिनी बसेसची संख्या वाढवून सोईसुविधा पुरवाव्यात, सामाजिक संघटनांची मागणी

पुणे : Bhima Koregaon Shaurya Din Vijaystambha | पेरणेफाटा येथील विजयस्तंभास 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त लाखो अनुयायी अभिवादनासाठी येत असतात, त्या ठिकाणी येणा-या नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी 1 जानेवारी रोजी बसेसची संख्या वाढवून इतर आवश्यक सोईसुविधा पुरवाव्यात अशी मागणी भीमसाम्राज्य संघटनेचे अध्यक्ष गणेश भोसले व नागरिक हक्क संरक्षण मंचाचे अध्यक्ष अविराज मराठे यांनी निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
पेरणेफाटा येथे राज्यभरातून अभिवादनासाठी दाखल होणा-या नागरीकांसाठी पुणे स्टेशन येथून विशेष बसेसची व्यवस्था पीएमपीएमएल कडून करण्यात येते. परंतू अभिवादनासाठी वाढती नागरिकांची संख्या लक्षात घेता बसेसची संख्या वाढवून वारंवारीतेतही वाढ करावी अशी मागणी गणेश भोसले व अविराज मराठे यांनी पीएमपीएमएलचे मुख्य परीवहन संचालक श्री. गव्हाणे यांची भेट घेऊन केली. यावर श्री. गव्हाणे यांनी पुणे स्टेशन येथून बसेसची सोय यावर्षी करण्यात आलेली असून आवश्यकतेनूसार संख्या वाढवली जाईल असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
तसेच पेरणेफाटा येथील विजयस्तंभाच्या परीसरात नागरीकांसाठी फिरती शौचालये, आरोग्य पथके, अग्नीशमन पथके, महिला व जेष्ठ नागरीकांसाठी स्वतंत्र्य रांगेची सोय, मुबलक पिण्याचे पाणी इ. विविध नागरी सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावात याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही या दोन्ही संघटनांना मार्फेत निवेदन सादर करण्यात आलेले आहे.