Wagholi Pune Crime News | तरुणीला धमकावुन जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या दोघा भावांना अटक; वाघोलीमधील घटना

पुणे : Wagholi Pune Crime News | तू माझीच आहे, माझे सोबत चल पळून नाही तर तुला तोंड दाखवायचे लायकीचे सोडणार नाही, असे धमकावून तरुणीला जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या दोघा भावांना वाघोली पोलिसांनी (Wagholi Police) अटक केली आहे.

गजानन संतोष आढाव Gajanan Santosh Adhav (वय २५) आणि गोपाळ संतोष आढाव Gopal Santosh Adhav (वय ३१, रा. आव्हाळवाडी, ता़ हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणीने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ नोव्हेबर ते २२ डिसेंबर दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. त्या महाविद्यालयात जात असताना गजानन आढाव हा नेहमी फिर्यादीकडे पाहून हातवारे करत तू माझीच आहे, असे म्हणून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत. (Molestation Case)

तसेच त्याने फिर्यादीच्या मोबाईलवर “माझे सोबत चल पळून नाहीतर तुला तोंड दाखवायचे लायकीचे सोडणार नाही. तुझ्या भावाचे तुकडे करेल, जर तू आली नाही,” असा मेसेज करुन जातीवाचक शिवीगाळ केली. फिर्यादीने हा मेसेज कोणाकडून आला हे तपासले तर ट्रुकॉलरवर गजानन आढाव असे नाव आले. फिर्यादीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर गोपाळ आढाव याने त्यांच्या मोबाईलवर “लय नाटक करुन नका, तुझे घरच्यांना नीट ताकीद दे, नाही तर तुझे घरी येऊन हातपाय तोडीन,” असा मेसेज करुन पुन्हा जातीवाचक शिवीगाळ केली. वाघोली पोलिसांनी अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख (PSI Vishnu Deshmukh) तपास करीत आहेत.