Vande Bharat Express For Pune | पुणेकरांसाठी गुड न्यूज! आता 2 नव्हे तर 6 वंदे भारत एक्स्प्रेस धावणार; प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

पुणे : Vande Bharat Express For Pune | सध्या पुण्यापासून दोन वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन धावतात. दरम्यान आता रेल्वे प्रशासनाने पुण्याहून आणखी चार वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी चार एक्स्प्रेस गाड्यांमुळे प्रवासाला अधिक गती मिळणार आहे.
अलिकडेच पुण्याहून दोन वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा प्रवास सुरु झाला आहे. या एक्स्प्रेस ट्रेनच्या मार्गिकवर पुणे-हुबळी, पुणे- कोल्हापूर आणि मुंबई-सोलापूर व्हाया पुणे या मार्गाचा समावेश होतो. आता नव्या अतिरिक्त वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांमुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन प्रवाशांचा फायदा होणार आहे.
मिळालेल्या अहवालानुसार, पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते बेळगाव या चार मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस गाडी धावणार आहे. लवकरच या एक्स्प्रेस ट्रेन सुरु होतील असे म्हटले जात आहे. असे झाल्यानंतर पुण्याहून आठवड्याला तब्बल ६ वंदे भारत एक्स्प्रेस धावतील. प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी हा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
सध्या सुरु असलेल्या पुणे- कोल्हापूर या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे एका वेळेचे तिकीट ५६० रुपये आहे. तर विशेष कोचमध्ये प्रवास करण्यासाठी १,१३५ रुपये शुल्क भरावे लागते. ही एक्स्प्रेस बुधवार, शुक्रवार आणि रविवार यादिवशी असते. वंदे भारतच्या पुणे-हुबळी मार्गिकवर प्रवास करायचा असल्यास १,५३० रुपये तिकीट घ्यावे लागते. तर विशेष कोचचे तिकीट २,७८० इतके आहे.